ख्रीस्चन समाजाला सत्तेचा वाटा द्या - लुकास केदारी

 महाराष्ट्र राज्यातून 12, तर पुण्यातून वडगावशेरीमधून ख्रिश्चन समाजाला उमेदवारी द्यावी अन्यथा येत्या विधानसभेत 'नोटा'चा पर्याय वापरणार - लुकास केदारी  यांचा इशारा 


पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये ख्रिश्चन समाजाला कोणतेही प्रतिनिधित्व न देता मविआने ख्रिश्चन समाजाची घोर फसवणूक केली असल्याने मविआ बद्दल समाजामध्ये तीव्र नाराजी आहे .त्यामुळे येत्या विधानसभेत आणि सत्तेत समाजाला वाटा देण्याची मागणी ख्रिस्ती समाजाचे नेते लुकस उर्फ़ प्रशांत केदारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


       महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला असून अनेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवाऱ्या जाहीर झालेले आहेत. महाविकास आघाडीकडून देखील काही संभाव्य नावे जाहीर होत आहेत यामध्ये एकही ख्रिश्चन उमेदवार दिलेला नाही. तसेच या कालावधीमध्ये ख्रिश्चन समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात व प्रश्नांवर कोणतीही चर्चा या नेत्यांकडून केलेली जात नाही, त्यामुळे महा विकास आघाडीला (मविआ) मोठ्या प्रमाणात सातत्याने मतदान करणाऱ्या ख्रिस्ती समुदायांमध्ये नाराजीचे वातावरण आहे व याचा गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पडण्याची शक्यता असल्याचे मत रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष लुकस उर्फ़ प्रशांत केदारी यांनी आज व्यक्त केले.



पुणे, श्रीरामपूर, अहमदनगर, जालना, नंदुरबार, कल्याण (पश्चीम), बेलापुर (मुंबई), घाटकोपर, पालघर ई, ठिकाणी ख्रिश्चन समाजाचा प्रभाव असणारे विधानसभा

         मतदारसंघ आहेत. या ठिकाणावरून ख्रिश्चन समाजाला संधी मिळावी अशी मागणी यापूर्वीच समाजाच्या वतीने मविआच्या नेत्यांकडे करण्यात आली होती, परंतु त्यांनी या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. संविधान वाचवणे व देशातील सामाजिक सलोखा कायम ठेवणे यासाठी महाविकास आघाडीला ख्रिश्चन समाजाने बिनशोर्त पाठिंबा दिला होता या बदल्यात मविआ ख्रिश्चनांच्या प्रश्नावर काम करेल अशी अपेक्षा होती पण ती सध्या फोल ठरताना दिसत आहे. असेही केदारी यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन समाजाची १६ % पेक्षा जास्त मते असल्यामुळे येथुन ख्रिश्चन समाजाचे नेते लुकस / प्रशांत केदारी यांना मविआने उमेदवारी द्यावी अशी मागणी समाजाच्या वतिने मविआकडे करण्यात आलेली आहे.


धर्मांतरणाच्या नावाखाली ख्रिस्ती समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जात असून चर्चेस तोडले जात आहेत व ख्रिस्ती धर्मगुरू यांना त्रास दिला जात आहे. ख्रिस्ती समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक असले तरी त्यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ख्रिस्ती समाजाच्या शिक्षण, आरोग्य व इतर सेवा विषयक विषयांशी संबंधित संस्थांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहेत. ख्रिश्चन समुदायाच्या जागा हडप करण्याचा प्रकार देखील सातत्याने समोर येत आहे. ख्रिश्चन लोकांना मारहाण करणे इत्यादी बाबी देखील पुढे आलेले आहेतं त्यामुळेच या प्रश्नावर विधिमंडळामध्ये आवाज उचलण्यासाठी ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे, त्या अनुषंगाने ख्रिश्चन समाजाच्या अनेक बैठका पार पडलेले आहेत. या बैठकातील निर्णयानुसार मविआकडे ख्रिश्चन समाजासाठी उमेदवारी मागण्यात आल्या होत्या.

भारतरत्न संत मदर तेरेसा यांचे नावे स्वायत विकास महामंडळ, ख्रिस्त सुरक्षा कायदा तसेच ख्रिस्ती उन्नती महामंडळ इत्यादी बाबी प्रलंबित असून त्या संदर्भामध्ये देखील कोणतीही चर्चा केली जात नाही ही आमच्यासाठी खेदाची बाब आहे. अनुसूचित जातीतून धर्मांतरीत ख्रिश्चनांना सूचित जातीच्या सवलती मिळाव्यात हे हे दिर्घकाळ प्रलंबित समश्या आहेत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ख्रिस्ती समाजाने नेमकी काय भूमिका घ्यावी ? याबाबत मोठा खल सुरू आहे. बहुतांश लोकांमध्ये महाविकास आघाडी आपल्याला उमेदवारी देणार नसेल तर आपण त्यांना मत का द्यावेत ? आपण नोटाचा 


पर्याय स्वीकारावा का ? किंबहुना बहिष्काराबाबत देखील चर्चा सुरू असल्याची माहीती लुकस / प्रशांत केदारी यांनी दिली.

" दरम्यान सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ख्रिश्चन समाजाला सत्तेतील सहभाग द्यायलाच हवा.वडगावशेरी हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पिंपरी पुणे इत्यादी , मतदारसंघांमध्ये समाजाचे मतदान ही लक्षणीय आहे त्यामुळे ख्रिश्चन समाजाची नाराजी मविआने तात्काळ दूर करावी अशी विनंती आम्ही मविआकडे केली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली .यावेळी प्रशांत केदारी ,अंतोन कदम,लुईस तेलोरे ,फाबियन सॅमसन ,सागर बारदोस,पीटर डी सोझा,रतन ब्राम्हणे 

,जॉन केदारी ,दिलीप घुटे यासह ख्रिस्चन समाजाचे पदाधिकारी व प्रमुख  उपस्थित होते .

Comments