महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूरसह जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्वभुमीवर कोल्हापूरसह जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. या  निवडणूकोच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्हयामध्ये एकूण 09 विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली असून, 02 कायम स्वरूपी सिमा तपासणी नाके व 02 तातपुरते सीमा तपासणी नाके कार्यानवित करण्यात आलेले आहेत. तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क येथे, नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क्‌ कोल्हापूरचे उप-अधीक्षक युवराज शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा1949 चे कलम 93 नुसार चांगल्या वर्तणुकिचे बंधपत्र घेणेबाबत एकूण 94 प्रस्ताव संबधीत उपविभागिय दंडधिकारी यांना सादर केलेले असून त्यापैको 69 आरोपीकडून बंधपत्र घेण्यात आलेले आहेत. तसेच बंधपत्र घेतलेल्या 8 आरोपी विरुद्ध पुन्हा गुन्हे नोंद केलेले आहेत. तसेच अवैध मद्याची निर्मिती व विक्री होण्याची शक्‍यता असलेल्या संशयीत जागा मालकास भारतीय न्यायसंहिता अतंर्गत्‌ नोटिस देण्यात आलेल्या आहेत. 


तपासणी नाके सिसिटीव्हीद्वारे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षात

कोल्हापूर जिल्यातील सर्व देशी व विदेशी मद्यनिर्माणी घटक तसेच सीमा तपासणी नाके येथील सिसिटीव्हीचे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षामध्ये उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. तसेच कोल्हापूर जिल्यातील सर्व आसवणी तसेच ठोक मद्यविक्री अनुशपतींच्या ठिकाणी सिसिटीव्ही यंत्रणा कार्यानवित केली आहे. सर्व  विशेष भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना अवैध मद्य निर्मिती,वाहतूक व विक्री विरुद्ध कडक कार्यवाही करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत तसेच, सर्व प्रकारच्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या विहित वेळेत चालू राहतील, याची दक्षता घेणे बाबत सुध्दा सूचना दिलेल्या आहेत.


  • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्वभुमीवर वाहनांची तपासणी करताना राज्य उत्पादन शुल्क विभागचे अधिकारी, कर्मचारी वर्ग. 

निवडणुका भयमुक्‍त आणि पारदर्शकतेसाठी पाऊल   

विधानसभा निवडणुक 2024 च्या निवडणुका भयमुक्‍त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याकरिता परराज्यातील अधिकारी (कर्नाटक राज्य व गोवा राज्य ) राज्य उत्पादपन शुल्कचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन अवैध मद्ययाची वाहतुक होणार नाही, याबाबत योगय त्या उपाय योजना करण्याचे निश्‍चीत करण्यात आले आहे. 


तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार : अधीक्षक स्नेहलता नरवणे

तसेच जिल्हास्तरावर अवेद्य मद्य निर्मीती ,विक्रो ब वाहतुक होत असल्यास नागरीकांना तक्रार नोंद करता यावी याकरीता महाराष्ट्र राज्य स्तरावर 8422001133 हा व्हॉटस अँप क्रमांक व टोल फ्रो क्र.18008333333 उपलब्ध करुन देणेत आलेले आहेत. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याने अशा स्वरूपाच्या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तसेच अशा ठिकाणांबाबत कोणतीही माहिती असल्यास सदर माहिती उपरोक्‍त क्रमांकावर कळविण्यात यावी, असे राज्य उत्पादन शुल्क्‌ कोल्हापूरचे अधीक्षक श्रीमती. स्नेहलता श्रीकर नरवणे यांनी आवाहन केले आहे. तसेच अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्री विरुद्ध मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही राज्य उत्पादन शुल्क्‌ विभाग कोल्हापूरचे अधीक्षक श्रीमती. स्नेहलता श्रीकर नरवणे यांनी सांगितले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क्‌ कोल्हापूरचे उप-अधीक्षक युवराज शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 




राज्य उत्पादन शुल्क्‌ विभाग, कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाची कामगिरी :
राज्य उत्पादन शुल्क्‌ विभाग, कोल्हापूर अधीक्षक या कार्यालयाने दि. 1 एप्रिल 2024 ते दि. 21 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रो विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे नोंदविलेले आहेत.

  • एकूण गुन्हे -1148
  • अटक आरोपी :1090
  • जप्त वाहने :48
  • एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु. 2,50, 48,776/-



Comments