छाननीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 38 नामनिर्देशनपत्रे अवैध

  • 20 जणांची उमेदवारी रद्द;
  • 10 जागांसाठी 201 उमेदवारांचे 286 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर, दि. 30:  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या कार्यक्रमानुसार कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 221 उमेदवारांनी 324 नामनिर्देशपत्रे प्राप्त झाली होती. या सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नामनिर्देशनपत्रांची दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. छाननीनंतर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 38 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. तसेच अवैध नामनिर्देशनपत्रांमधील 20 उमेदवारांची उमेदवारी रद्द झाली. यानंतर 10 जागांसाठी 201 उमेदवारांचे 286 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

छाननीनंतर अपुर्ण कागदपत्र तसेच नमुना आणि नमुना बी सादर केल्याने अवैध नामनिर्देशन ठरलेले विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवाराचे नाव आणि पक्ष पुढिलप्रमाणे

271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांनी 45 नामनिर्देशनपत्र भरले होते. या 45 नामनिर्देशनापैकी 38 वैध तर 7 नामनिर्देशपत्रे अवैध ठरली. यामुळे 25 उमेदवारांची 38 नामनिर्देशपत्रे वैध ठरली आहेत.

271 चंदगड विधानसभा मतदारसंघ, अवैध अर्जांची नावे पुढीलप्रमाणे :
1. राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष),
2. विलास शंकर नाईक (अपक्ष),
3. सुस्मिता राजेश पाटील (नॅशनल काँग्रेस पार्टी),
4. सुस्मिता राजेश पाटील (नॅशनल काँग्रेस पार्टी),
5. सुस्मिता राजेश पाटील (नॅशनल काँग्रेस पार्टी),
6. कुपेकर देसाई संध्यादेवी कृष्णराव ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार),
7. कुपेकर देसाई संध्यादेवी कृष्णराव ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार).

 

272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 28 नामनिर्देशनपत्र भरले होते. या 28 नामनिर्देशनापैकी 27 वैध तर 1 अवैध ठरले. त्यामुळे आता 14 उमेदवारांचे 27 अर्ज वैध आहेत.

272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ, अवैध अर्जांची नावे पुढीलप्रमाणे:

1. शहाजी रामकृष्ण देसाई (संभाजी ब्रिगेड पार्टी)


273 कागल विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 33 नामनिर्देशनापैकी 26 वैध तर 7 अवैध. आता 21 उमेदवारांचे 26 अर्ज वैध आहेत.

273 कागल विधानसभा मतदारसंघ, अवैध अर्जांची नावे पुढीलप्रमाणे :

1. याकुब कमरुद्दीन बेलिफ (अपक्ष),

2. हिंदुराव राजाराम अस्वले (अपक्ष),

3. नाविद हसन मुश्रीफ (नॅशनल काँग्रेस पार्टी),

4. नाविद हसन मुश्रीफ (नॅशनल काँग्रेस पार्टी),

5. नाविद हसन मुश्रीफ (नॅशनल काँग्रेस पार्टी),

6. अश्विन अर्जून भुजंग (अपक्ष),

7. घाटगे नवोदिता समरजितसिंह (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)

 

274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 25 उमेदवाराने 33 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 33 नामनिर्देशनापैकी 30 वैध तर 3 नामनिर्देशन अवैध. आता 24 उमेदवारांचे 30 अर्ज वैध आहेत.

274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ, अवैध अर्जांची नावे पुढीलप्रमाणे :

1. ज्योती सुरेश आठवले (बहुजन समाज पार्टी),

2. विशाल केरु सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष),

3. शौमिका अमल महाडिक (भारतीय जनता पार्टी)

 

275 करवीर विधानसभा मतदारसंघात 14 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 22 नामनिर्देशनापैकी 18 वैध तर 4 नामनिर्देशन अवैध. आता 13 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन वैध आहेत.

275 करवीर विधानसभा मतदारसंघात अवैध नावे पुढीलप्रमाणे :

1. तेजस्वीनी राहूल पाटील ( इंडियन नॅशनल काँग्रेस),

2. तेजस्वीनी राहूल पाटील ( इंडियन नॅशनल काँग्रेस),

3. तेजस्वीनी राहूल पाटील ( इंडियन नॅशनल काँग्रेस)

4. राजलक्ष्मी चंद्रदीप नरके (शिवसेना)

 

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 33 नामनिर्देशनापैकी 31 वैध तर 2 अवैध. आता 23 उमेदवारांचे 31 अर्ज वैध आहेत.

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात अवैध नावे पुढीलप्रमाणे :

1. मालोजीराजे छत्रपती शाहू छत्रपती ( इंडियन नॅशनल काँग्रेस),

2. अजित सुलभा दत्तात्रय ठाणेकर (भारतीय जनता पार्टी)


277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 27 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. सर्वच्या सर्व 27 नामर्निेदशपत्र वैध ठरले आहेत.

 

278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 25 उमेदवाराने 35 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 35 नामनिर्देशापैकी 32 वैध तर 3 नामनिर्देशपत्र अवैध ठरले. आता 25 उमेदवारांचे 32 अर्ज वैध आहेत.

278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अवैध नावे पुढीलप्रमाणे :

1. गणेश विलास वाईकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

2. वैभव शंकर कांबळे, स्वाभिमानी संघटना

3. अशोक आकाराम कांबळे, शिवसेना

 

279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 33 नामनिर्देशनापैकी 27 वैध तर 6 नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. आता 18 उमदेवारांचे 27 अर्ज वैध आहेत.

279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अवैध नावे पुढीलप्रमाणे :

1. श्री संजय भुपाळ बेडक्याळे (स्वाभीमानी पक्ष),

2. श्री दत्तात्रय मारुती मांजरे (राष्ट्रीय मराठा पक्ष),

3. प्रतापराव क्षमानंद पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),

4. श्री उदयसिंह मारुती पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार),

5. रवि विठ्ठल पाटोळे (अपक्ष),

6. प्रकाश कल्लाप्पा आवाडे ( भारतीय जनता पार्टी)

 

280 शिरोळ विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांनी 35 नामनिर्देशनपत्र भरण्यात आले होते. या 35 नामनिर्देशपत्रापैकी 30 वैध तर 5 नामनिर्देशपत्र अवैध ठरले. आता 23 उमेदवारांचे 30 अर्ज वैध आहेत.

280 शिरोळ विधानसभा मतदारसंघातअवैध नावे पुढीलप्रमाणे :

1. बाळासो मारुती कांबळे ( अपक्ष),

2.बजरंग आप्पा कुंभार (जनता दल सेक्युलर),

3. प्रविणकुमार शामराव माणगावे (जनता दल सेक्युलर),

4. सुनिल बळवंत कुरुंदवाडे (अपक्ष),

5. गब्बर सुदाम सकट (जनहित लोकशाही पार्टी) यांचे नामनिर्देशपत्र

अवैध ठरले आहेत.

 


Comments