ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क/पुणे, दि. 8 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवासीभाडे (Passenger fare) आकारण्यात येऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यात यावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारला केली आहे.
गुरुवारी (दि. 7 मे ) मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही मुद्दे मांडले होते. त्यापैकी राज्य आणि राज्याबाहेरील स्थलांतरित कामगारांचा मुद्दा होता.
अशा कामगारांना ST (राज्य ट्रान्सपोर्ट) मार्फत त्यांच्या गावी सोडण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र त्यांच्याकडून प्रवाशी भाडे (Passenger fare) आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून राज्या अंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या कामगारांकडून भाडे आकारण्यात येऊ नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.
करोना विषाणूचे अपडेट पहिले तर, असे दिसते कि करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थलांतरित कामगारांकडे पैसे नसून त्यांची प्रवाशी भाडे (Passenger fare) देण्याची परिस्थिती नाही.
त्यामुळे शासनाने या मजुरांचा प्रवास खर्च स्वतः करावा आणि या कामगारांना त्यांच्या गावी नेऊन सोडावे. शासनाने हा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.