ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 13 - महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूमुळे मुळे पोलीस (Police) दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान आणि येणारा ईद सण लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी नुकतीच दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस दला (Central Armed Police Force) च्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे.
पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दला (Central Armed Police Force) च्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.