ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - आपल्या अभिनयाने लाखो, करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याने आज जगातून कायमचा अलविदा केला. होय, 'लाईफ ऑफ पाय'मधील 'टायगर' गेला अर्थात अभिनेता ("Actor") इरफान खान (Irfan Khan) यांचं आज (29/04/2020) निधन झाले.
आपल्या अभिनयाच्या कारकीर्दमध्ये या अभिनेत्याने अनेक चित्रपटात काम केले. बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला. 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटामध्ये तर दोन जीव एकाच बोटीवर कसे राहू शकतात. आणि ते कसे एकत्र येतात. यात मनुष्य आणि वाघ हेच दोन जीव दाखविण्यात आले आहेत.
आपण प्राण्याच्या सानिध्यात गेलो कि तेही आपल्या सानिध्यात येऊन आपल्याला कसे आपलंस करतात, हेच उत्कृष्ट अभिनयाने इरफान खान (Irfan Khan) याने दाखविले आहे.
या अभिनेत्याचे आडनाव जरी खान असले तरी तो इतर खान पेक्षा वेगळा आणि लोकप्रियही. इरफान खानने दूरदर्शनवरील चंद्रकांता (Chandrakanta) टीव्ही सीरिअलवर देखील काम करत करत त्यांनी पुढील वाट धरली.
जेव्हा इरफान खानला कर्करोग अर्थात कॅन्सर(Cancer) आहे हे कळते, तेव्हा तो एक ठिकाणी म्हणतो कि, आपण आता मृत्यूच्या वाटेवर पोहोचलोय. केव्हाही जाणारच. पण, हे कळल्यानंतर मिळालेलं आयुष्य हेच मोठं स्वातंत्र्य होत.
अशा या अभिनेत्याला 'ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क' (Global Market News Netwrok) टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन.