'करोना' विरुद्ध लढण्यासाठी दानशूरांनी मदत करावी -'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने आवाहन

ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क/मुंबई - सध्या जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाहाकार माजला आहे. महाराष्ट्रामध्येही या आजाराच्या विळख्यात अनेक जण अडकले आहेत. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक समूह अडचणीत आहे. त्यामुळे 'करोना' विरुद्ध लढण्यासाठी दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 


स्थलांतरित लोकं, कामगार, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, एकल महिला, हमाल, माथाडी कामगार, स्थलांतरित मजूर, मजूर अड्ड्यावर काम करणारे, देहविक्री करणाऱ्या भगिनी, तृतीय पंथीय, ऊसतोड कामगार, रस्त्यावर राहणारी कुटुंब या सारख्या हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे.


राज्याच्या अनेक भागातून मदतीसाठी लोकांकडून विनंती करण्यात येत आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून लोकांच्या मदतीसाठी खालील पाच लोकांची कॉ-ऑर्डीनेशन कमिटी बनवण्यात येत आहे. ज्या लोकांना काहीही अडचण असेल, मदत हवी असेल तर खालील नंबरवर व्हाट्सअप्प, मॅसेज करून संपर्क करावा.


वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या कार्यकर्त्यांना volunteer (स्वयंसेवक) म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी तसेच आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनीही संपर्क साधावा. ज्यांना आर्थिक, वस्तूंची मदत करायची असेल त्यांनी खालील नंबरवर माहिती पाठवावी.


VBA - आपले नाव - जिल्ह्याचे नाव - ठिकाण. असं लिहून पाठवणे.
उदा. आपले नाव - VBA - पुणे - बारामती.
मदत करू इच्छिणार्यांसाठी खालील बँक डिटेल्स पुढीलप्रमाणे -
नाव - Vanchit Bahujan Aaghadi
Bank name - state bank of India
A/C No. - 38740051462
IFS code - SBIN0004114
Hindu colony, Dadar East, Mumbai


आपली मदत गरजूंपर्यंत पोहचवली जाईल.


संपर्कासाठी - :
1. अशोकभाऊ सोनोने - 9175644052
2. महेंद्र रोकडे - 7977352263
3. ऍड. प्रियदर्शी तेलंग - 9673313177
4. स्वेल वाघमारे - 8879649654
5. जितरत्न पटाईत - 7385550633



Comments