'महाड सत्याग्रह'; क्रांती दिन

ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क- महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो.


ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.


(Source : Wikipedia, Internet.)

तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस,
एकाच ओंझळ प्यायलास पण, सारे तळे चवदार केलेस.ll


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन
                      -ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क



Comments