ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - श्री.अग्रसेन ट्रस्ट चिंचवड- प्राधिकरण समितीचे कार्यकारी सदस्य सुनील जयकुमार आगरवाल यांच्या पुढाकाराने वाहतूक नगरी येथे गरीब, गरजूंना मोफत अन्नधान्य आणि जेवण देऊन भूक भागवली. गरीब ३५० नागरीकांना जेवण दिले तर १५० कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रेमचंद मित्तल,सुनील ज.आगरवाल,सत्पाल मित्तल, जोगिंदर मित्तल,संदीप गुप्ता,मुकेश मित्तल,रमेश गोयल,श्री तायल,सुजीत गर्ग, सुरेंद्र आगरवाल यांचे सहकार्य लाभले.
कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे हॉटेल्स बंद असल्याने आहे. या स्थितीत बेरोजगार,ड्रायव्हर व गरीब नागरीकांचे हाल होत आहे. याचे भान ठेवून हा उपक्रम दिनांक १४ एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती सुनील आगरवाल यांनी सांगितली.
Corona Virus : पिंपरीतील वाहतूक नगरी येथे आगरवाल समाजाकडून शहरात अन्नदान
Click Here for Read More....