जागतिक महिला दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा!!

जागतिक महिला दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा!!
ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क टीमकडून तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!


बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.
ती शहाणीच होती... आधीपासून. आजही आहे.
उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.
ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही.
ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही.
ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे.
ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे.
ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही.
मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी.
आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल..


जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!


..........................................
एक महिला कधी मस्जिदची मौलाना नाही बनू शकत..,
एक महिला कधी मंदिराची पुजारी नाही बनू शकत..,
एक महिला कधी चर्चची फादर नाही बनू शकत...
पण...
एक महिला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, खासदार, मंत्री, आमदार, कलेक्टर, सचिव, सरपंच सगळं बनू शकते....
कारण...
जे धर्म देऊ शकत नाही ते संविधानानं दिल आहे...!


सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
(Source : what's up group/ social media messages)



Comments