अनुकंपातत्वावरील पात्र वारसांना महापौर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क – महानगरपालिकेकडील मयत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपातत्वानुसार पात्र 8 वारसांना आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.


आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिका सेवेत सामावून घेणेचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे अनुकंपातत्वानुसार पात्र असलेल्या आनंदा पाटील, कुंभार, निलेश कदम, सौरभ बाचणकर, शुभम सावंत, सोनल माने, कांबळे व निखिल फाळके असे एकुण 8 कर्मचाऱ्यांना नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली.


यावेळी उप-महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक परमार, अर्जुन माने, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड व कर्मचारी आदी उपस्थित होते.


महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते देण्यात आली नियुक्तीपत्रे



Comments