आगरवाल फेडरेशनतर्फे महिलांना माता माधवी अग्र गौरव पुरस्कार प्रदान
ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - समाजातील पिडीत महिलांना आधार देऊन त्यांना सहकार्य केले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला, असे म्हणता येईल, असे प्रतिपादन साताऱ्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
आगरवाल समाज फेडरेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना माता माधवी अग्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सॅलिसबरी पार्कमधील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संपन्न झाला. चंपादेवी आगरवाल( वय ९९) यांना जीवन साधना पुरस्कार तर अंजू सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
शकुंतला बंसल,लीला गोयल,प्रेमलता आगरवाल आदर्श माता पुरस्कार, रोशनी गोयल,जानकी आगरवाल,कमलादेवी आगरवाल यांना आदर्श गृहिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नमिता सु. गर्ग(व्यापार क्षेत्र),रेणू आगरवाल यांना आदर्श उद्योजिका पुरस्कार,डॉ नेहा गोयल यांना युवारत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच पुष्पा गुप्ता यांना पर्यावरण जागृती पुरस्कार, रिटा सु. आगरवाल धार्मिक पुरस्कार, गायिका अनिता आगरवाल( सांस्कृतिक), रश्मी आगरवाल( शैक्षणिक क्षेत्र),मंजू विनोद बंसल(सामाजिक क्षेत्र), मानसोपचार तज्ञ डॉ विजया आ. गोयल( वैद्यकीय क्षेत्र), डॉ रिचा आगरवाल यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कायनेटिक इंजिनिअरिंग च्या संचालिका डॉ जयश्री फिरोदिया, आगरवाल फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद बंसल, सचिव सीए के.एल बंसल,कोषाध्यक्ष श्याम गोयल, समन्वयक संजीव आगरवाल,फेडरेशनच्या महिला अध्यक्षा निता आगरवाल, उपाध्यक्ष सुनीता आगरवाल,सचिव उषा तुलसीयान,खजिनदार सरस्वती गोयल,उद्योजक प्रेमचंद मित्तल,ॲड महेश आगरवाल, डॉ अशोक आगरवाल,राजेश मित्तल,राधेश्याम आगरवाल,विजय मित्तल,गीता गोयल,रतन गोयल, सुधीर आगरवाल आदी उपस्थित होते.
डॉ फिरोदिया म्हणाल्या कि, पुरातन काळापासून नारी हि अबला नाही तर सबला आहे.निसर्गाचा समतोल संतुलित ठेवण्यासाठी मुला मुलींचा समान दर ठेवला पाहिजेत. मात्र स्त्री भ्रूणहत्यामुळे मुलींची संख्या कमी झाली.यामुळे बलात्कार जळितकांड असे प्रकार घडत आहे.समाजात सून हवी मात्र मुलगी नकोत हि मानसिकता बदलली पाहिजेत.
कृष्णकुमार गोयल म्हणाले कि,महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुरस्काराने युवक युवकांना कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.
प्रास्ताविक निता आगरवाल यांनी केले.आभार के एल बंसल यांनी मानले.