Kolhapur : 'राजे' फक्त तुम्हीच; 'जय भवानी, जय शिवाजी'

ग्लोबल मार्केट न्यूज नेटवर्क - छत्रपती शिवाजी महाराज कि...  नुसतं म्हटलं तरी आपसूकच 'जय', असं म्हटल्याशिवाय राहत नाही. जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा देत आज शिवरायांची जयंती विविध ठिकाणी साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ आणि आताच काळ यात खूप फरक आहे. तशी तुलना होणे नाही. तरीही, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्याची, विचारांची आज प्रत्येकाला, समाजाला आणि देशाला आजही आवश्यकता भासते, तसेच प्रेरणादायीही ठरत आहे. म्हणूनच प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे या देशात पुन्हा होणे नाही. म्हणूनच 'राजे' फक्त तुम्हीच; 'जय भवानी, जय शिवाजी'. 



Comments